पांडुरंगा...
पांडुरंगा...
दाटला कंठ पांडुरंगा तुझा
कळते आहे वेदना
भेट नाही घडली तुझी
परि नाही थांबली साधना
तळमळतो जीव बापडा
थरथरली पावले
डोळे लावूनी वाटेकडे
मन पंढरीला धावले
गजर हरिनामाचा मुखी
टाळ मृदुंगाची शोभा
सावट भितीचे जरी
मनी पांडुरंग उभा
