STORYMIRROR

Prashant Shinde

Classics

3  

Prashant Shinde

Classics

पांडुरंग...!

पांडुरंग...!

1 min
336

आता विश्वात्मकें सुरू झाले

तसे ध्यान भानावर आले

आणि सकाळी सकाळीच

पुन्हा फर्मान सुटले....!


आज एकदशी आहे उपवास करा 

नाही तर चराल भसा भसा

म्हंटले हा कोणता अवतार

रुक्मिणी करत नव्हती, वसा वसा...!


चला म्हंटले दिवस सुरू झाला

पांडुरंगा काय रे केला मी गुन्हा..?

सदा अंगावर व्हसकन येते 

तीच ती गोष्ट सांगते पुन्हा पुन्हा...!


पांडुरंग हसला आणि म्हणाला

अरे संसार संसार जसा मधुर वेणू

मी म्हंटले देवा बस, नको 

त्या बाईची आठवण करून देऊ...!


परत हसला आणि म्हणाला

सुटला नाही हा ताप देवांनाही

तू रे कोण टेकोजी राव

करू दे तिला मुकाट काव काव ही....!


समाधान माऊलीचे असते बोलण्यात

पाय तिचे असतात गुढगाभर पाण्यात

भर पडते आपोआप पुण्यात

ऐकावे जनाचे करावे मनाचे राहून गुण्यात....!


मी ही तेच केले, हात ठेवुनी कडेवर

झटकले नाही म्हणुनी दावण्यास

ना हो ,ना ना ,रीत सांभाळून

तिला मायेने बाबा सांभाळण्यास....!


म्हंटले आज देवची पावला

चांगला उपाय मज सांगितला

विठ्ठल विठ्ठल म्हणोनी

सुखाने हसत चहा गरम गरम घेतला...!


म्हंटले प्रेमाने काळजी नको करू

भक्तीचा मार्ग दोघे मिळून धरू

राग सारा गिळून पुन्हा सखे आता

संसार हा आपला सुखाने करू....!


कर तू साबूची खिचडी मसालेदार

आज मी विठ्ठल तुझा जोडीदार

वरीचा भात दाण्याची आमटी

खजूर खाऊन बघ काढीन चिमटी....!


हसली रुक्मिणी म्हणे पहा देवा

भक्त हा तुमचा पहा आहे द्वाड

द्या हो याला आता संसार करण्या

सौख्य समाधान शांतीचे घबाड....!


ऐकून वाणी रुसल्या रुक्मिणीची

पांडुरंग झाला की हो प्रसन्न

म्हणे द्वाड भक्ता केलीस रे जादू

तुझ्या पायी वेड्या आम्हीही सुखाने आता नांदू...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics