पाहिलं पाठमोरं
पाहिलं पाठमोरं
पाहिलं पाठमोरं तू असल्याचा भास झाला
नकळत डोळ्यांसमोरून जुना काळ गेला
हो, ती तूच होतीस, भरजरी लाल शालूत
पहिल्यांदा भेटलेली तू सोनसळी वाळूत
तुझ्या पापण्यांनी अलगद टाकला कटाक्ष
तेव्हाच पटली मला आपल्या प्रेमाची साक्ष
तुझ्यावर आणि तुझ्यावरच होत्या नजरा
केसांत माळलेला तू पांढराशुभ्र गजरा
नटली छान, सुंदर दागिन्यांनी मढलेली
तिथे तू गं, विवाह बोहल्यावर चढलेली
मी इथे एकटा, उदास आणि केविलवाणा
मनात मात्र मी तुझा आणि तुझाच दिवाणा
इतकी वर्षं गं, जगलोच ना मी तुझ्याविना
तू ही घेशील ना जगून सुखाने माझ्याविना ?
दिल्या घरी तू सुखी राहावी, ही एकच इच्छा
तुझ्या भावी सांसारीक आयुष्याला घे शुभेच्छा
