STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

ओवी सेवकांची

ओवी सेवकांची

1 min
116

पहिली माझी ओवी गं 

देव गजाननासाठी

देव गजाननासाठी

उभा पाठी भक्तांसाठी


दुसरी माझी ओवी गं

डाँक्टर देवदूतांसी

डाँक्टर देवदूतांसी

रुग्णांना वाचविण्यासी


तिसरी माझी ओवी गं

मान दानशूरांसाठी

मान दानशूरांसाठी

अन्नदान लोकांसाठी


चौथी माझी ओवी गं

छोट्या बालमित्रांसाठी

छोट्या बालमित्रांसाठी

देती पैसे रुग्णांसाठी


पाचवी माझी ओवी गं

आहे परिचारिकांसी

आहे परिचारिकांसी

उभ्या लस टोचण्यासी


सहावी माझी ओवी गं

जनता जनार्दनासी

जनता जनार्दनासी

दूर पळवी रोगासी


सातवी माझी ओवी गं

समाज सेवकांसाठी

समाज सेवकांसाठी

झटले जनतेसाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract