ओंजळ
ओंजळ
पहावया नेञ हे
सुलोचन व्हावे लागते
प्रितीस मिळवावया
आशा संपवावी लागते
शुद्ध जरी हा भाव
का स्वार्थ मनी वाटतो
तुझ्या विना तळ्यातला
स्वर्ग खाली भासतो
सजविला गालीचा मी
सुगंध कोण उधळीतो
उरलेल्या पाकळ्यात
निर्माल्य मज गवसतो
डोळे उचलून पहावया
मन पापणी जडावते
अनोळखी मिलन ते
नि:शब्द जीवास सलते
हातातल्या हातातली
ओंजळ माझी वाटते
वेदना ही काय कमी
तुला मी परकी वाटते !!!
