ओळख
ओळख
माझा मीच भेटलो
मला एका संध्याकाळी,
प्रश्न विचारला मनाला
मी आहे तरी कोण?
अनोळखी सगळेच असतात
ओळख होण्याअगोदर,
परिचय कोणाचा
आणि आठवण कोणाची?
तुम्हीच तुमचे श्रद्धास्थान
आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य,
तुमच्या भावना तुमचे छंद
तुमचे प्रेम आणि तुमची आवड
तुम्हीच तुमचे रहस्य
तुमच्याच चेहऱ्यावरचे हास्य
मीच माझा ध्यास
आणि मीच माझा श्वास
कळलेच नाही मला कधी
ओठांवरचे शब्द माझ्या,
लेखणीतून पेपरवर आले
आणि तुमच्यासमोर प्रसवले
मनाला नाही थांबविले मी
उत्स्फुर्तपणे व्यक्त झालो मी,
लिखाण झाला माझा छंद
कविता ही झाली माझी ओळख
