STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract

3  

AnjalI Butley

Abstract

ओली झाली घरं

ओली झाली घरं

1 min
533

ओली झाली घरं

वाळत कुठे टाकायची

चिमुकल्याला पडला प्रश्न

विचारत होता आईला


आई जवळ उत्तर नव्हतं

आकाशाकडे ती एकटक पाहात होती

चिमुकल्याला वाटलं

ती सुर्याकडे पाहात होती


सूर्य काही दिसेना

नुसत्याच धारा लागल्या आकाशाला

आई सांग ना गं 

कोणी मारलं सुर्याला


रडतो कधीचा तो इतका

रडून रडून त्याच्या डोळ्यातून

इतके का गं पाणी

आकाशातून जमिनीवर कोसळले


आई सांग त्याच्या आईला

थांबवा त्याचे रडणे

दुध भाताचा नैवद्य दाखवू

करू त्याची नित्य सेवा


ओली झाली घरं

थांबव तुझे रडणे आता

दाखव तुझे तळपते दर्शन

त्याने वाळेल आमचे घरं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract