STORYMIRROR

Rutuja kulkarni

Romance Others

3  

Rutuja kulkarni

Romance Others

ओढं असते

ओढं असते

1 min
205

घट्ट मिटलेल्या पापणीला,

निळया स्वप्नांची ओढं असते.

बेधुंद त्या रात्रीला, 

रातराणी च्या सुगंधाची ओढं असते...! 


उधाणलेल्या लाटांना,

सागर किनार्‍याची ओढं असते.

मावळत्या सूर्याला,

क्षितीजाशी ओढं असते...! 


उनाड प्रियकराला,

प्रेयसीच्या भेटीची ओढं असते.

विरहांत तळपलेल्या सखीला,

सख्या च्या मिलनाची ओढं असते...! 


मृत्यूने मिठी मारलेल्यांना, 

एका श्वासाची ओढं असते.

आयुष्याचा गंध उमगलेल्यांना,

जगण्याची ओढं असते...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance