ओढ
ओढ
तुझ्याबद्दल मनात ओढ
जरा जास्तच होती
हे माहित असताना की
तू माझी कधीच होणार नव्हती
आठवतात ते क्षण
जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो आपण
तू गालातल्या गालात गोड हसत होती
माझ्या डोळ्यात मात्र पहिल्या भेटीचे आसवं होती
मनात तुझ्यासोबत बोलण्यासाठी
खूप काही साठवलं होतं
तू समोर आल्यावर मात्र
शब्दांना बाहेर यावंसं वाटतच नव्हतं
सगळं काही विसरून मी
फक्त तुलाच पाहत होतो
सौंदर्य तुझं पाहण्यात
मंत्रमुग्ध झालो होतो
प्रत्येक क्षणी तूच आठवत होतीस
मनाला ओढ तुझी जास्तच होती
मला तुझ्यासारखी नको
तूच हवी होती तूच हवी होती

