ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
38
घन शिंपडती दवबिंदूत
तरारली ही तरुण पाती
कोवळ्या धुक्यातूनीच
नाली प्रीतीची नाती
ओढ पावसाची लागे
चातक पक्षी तहानला
थेंब दवाचा पिऊनीया
उंच आभाळी भरारला
अमृत कणांचे सिंचन
झाले या धरणीवरी
दिवस सुखाचे दावून
आले चैतन्य चराचरी
उडाला चातक नभात
तहान थेंबांची भागली
निसर्गसृष्टी नव्यानेही
जलधारांमधुनी रंगली