!! ओढ मायेची !!
!! ओढ मायेची !!
1 min
335
माय तूझ्या भेटीसाठी ,
मन अधीर अधीर !
दिसा माजी जाती दिस ,
आता धरवेना धीर !!
तूझ्या कुशीची ग आस ,
लागे माझ्या ग जीवाला !
गालाची ती लाली गेली ,
कुणी ही कुरवाळेना!!
पडे सडा प्राजक्ताचा .
जरी माझ्या ग अंगणी !
मनी फुलेना मोगरा ,
चित्त नाही थाऱ्यावरी !!
आई येते का ग कानी ?
हाक माझ्या अंतरीची !
मन माझे सावरेना ,
साद तुझी ग येईना !!