STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy

3  

Vijay Sanap

Tragedy

ओढ घराची

ओढ घराची

1 min
8.3K


गेले मायबाप देवा घरी

कशी आणली रे वेळ

नियतिनं साधला डाव

असा कसा मांडला खेळ ।।


ऊस तोड मायबाप

झाला कसा अपघात

गेले सोडून आम्हाला

झाले लेकरे अनाथ ।।


रात दिस करे कष्ट

पोशी आमचे ते पोट

रडणाऱ्या तान्ह्या बाळा

माय पाजी दोन घोट ।।


फाटक्या गोधडीत माय

देई उब लाडक्या बाळा

संदी साधून काळाणे

कसा घोटीला रे गळा ।।


अश्रू वाहती नयनी

कवटाळून छोट्या बाळा

येता आठवण आईची

येतो दाटून उमाळा ।।


ओढ लागता घराची

लागे माऊलीची आस

तान्ह्या लेकराच्या तोंडी

कोण भरवील घास ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy