नवयुग नारी
नवयुग नारी
नव्या युगाची महिला
नव विचारसरणी
आधुनिक रहाणीची
नव मतांची धारिणी (१)
घर आणि कचेरीची
कसरत सांभाळते
अष्टभुजा देवी जणू
कला क्रीडाही पेलते (२)
भाजी नित्य आणतसे
कोणा कुठली आवडे
स्वयंपाक रुचकर
नच कामाचे वावडे (३)
नवयुग नारी सखे
नको मदिरा सेवन
नारी पवित्र जगात
नको सामिष जेवण (४)
संसाराचे रथचक्र
अर्थार्जन नेमे करी
लँप-टाँपवर काम
वेगे अचूक संपवी (५)
वेड कुत्र्याचे हिजला
वेगवान जीवनात
सँनिटायझर साह्ये
कोरोनावरती मात (६)
डोक्यावर बसलेल्या
पुरुषास उतरवी
स्वयंसिद्धा नारी आज
जगा कर्तृत्व दाखवी (७)
