नव्याने सामोरं जावं
नव्याने सामोरं जावं
कधी कधी वाटतं फेसाळत्या
ग्लासा बरोबर धुंद व्हाव
हा काय म्हणेल, तो काय म्हणेल
मानेवरचा जोखड फेकून द्यावं
उन्मादात गाव, मस्ती
मध्ये नाचावं,
फेसाळत्या सोनेरी द्रव्याला
पोटामध्ये रिचवाव
मदहोश व्हाव, बेधुंद व्हावं
मनाच्या तळाशी साचलेले
भडाभडा ओकाव
स्वच्छ मोकळं व्हावं
आणि येणाऱ्या नववर्षाला
नव्याने सामोरं जावं
मग काय चला नवीन वर्षाच्या पार्टीला
