नवतंत्र
नवतंत्र
आलेल्या अडथळ्यांनी खाक झाली स्वप्ने
राख पाखडतांना ठिणगी न विझली सखे!
ठिणगी कडे एकटक पाहता मोठे झाले डोळे
बघता बघता ठिणगीने ठिकाणावर आणले ठोकताळे!
खाक झालेल्या स्वप्नांना मिळाले नव पंख विचारांचे
पंखातील बळाने घेतली मग उंच भरारी नव जीवनासाठी!
अपयशाकडे मागे वळून न बघता घेतले नव धडे
गिर गिर गिरवले यशाचे नवतंत्र ठेवण्या मज समाधानी!
