Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Action Classics Inspirational

3  

Shobha Wagle

Action Classics Inspirational

नवरत्नांची खाण महाराष्ट् राज्य

नवरत्नांची खाण महाराष्ट् राज्य

1 min
125


देशातील एकोणतीस प्रांतामध्ये

आहे महाराष्ट्र माझा प्रांत महान

हिरवाई व दऱ्या खोऱ्यांनी वेढलेला

शिवरायांचा इतिहासाने भरलेला छान.


महान देश सेवक जन्मले येथे अनेक

आहे महाराष्ट्र माझा नवरत्नांची खाण

आगरकर, टिळक, चाफेकर बंधू अशा

अनेकांनी समाज व देशास अर्पिले ज्ञान.


साहित्य शिरोमणी अण्णाभाऊ साठे

महान शाहीर व कथा कांदबरीकार

शान आहे माझ्या सुंदर महाराष्ट्रची त्यांनी

घेतला मुंबई व महाराष्ट्र घडवण्या अधिकार


"स्वराज्य माझा जन्म सिध्द हक्क आहे"

अजूनही घुमतो नारा देश स्वाभिमानाचा

लोकमान्य टिळक होऊनी गेले गौरवस्पद

हिरा अवतरला किती अभिमान महाराष्ट्राचा


समानतेचा धडा शिकवती इथले सणवार

ईद सणात ही दाखवतो आम्ही बंधूप्रेम

भाई चारा बंधूभाव इतिहासाची परंपरा

आज ही पहा ते महाराष्ट्रातले प्रांतीय प्रेम


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action