नवरस लाज
नवरस लाज
शहाणपण आले तशी, लाज काय ती समजली
तऱ्हा तिच्या ना ना निराळ्या, कळणाऱ्यालाच उमजली
फाटके कपडे असो की परीस्तीथी, विषमता जाणवते मना
प्रतिकार तेव्हा चालू होतो, वाटते उत्तर द्यावे कोणा कोणा
सगळेच घेतात म्हणून, काही जन लाच घेतात
बाहेर भेटलो कालांतराने की, नजर लगेच लपवतात
बर पहिलं प्रेम पाहून, कल्पना विश्वात रंगतात
लाजेच हे एक वेगळं रूप, पौगंडावस्थात मिरवतात
बायकोच लाजनही वेगळं असत, ते नवरा झाल्या शिवाय कळणार नाही
पण प्रत्येक नवरा त्याच्या बायकोचे हे रूप, याची डोळा पाही
शेवटी लाजच तु, कोणत्या ना कोणत्या प्रकारे येणारं
ती ती परिस्थीती, तुलाही नवरसाचा प्रसाद देणारं
