STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Inspirational

नवरंग

नवरंग

1 min
299

१)

प्रथम स्वरूप शैलपुत्री

हिमालयाची कन्या

पिवळा रंग परिधान करीसी

आशेचा,वैभवाचा,मांगल्याचा


२)

दुसरे स्वरूप ब्रम्हचरिणी हाती शोभे 

अष्टदलाची माळ व कमंडलू

हिरवा रंग लेवूनी निसर्गाचा स्थिर

प्रगती,समृध्दी,सहनशीलतेचा


३)

तिसरे स्वरूप चंद्रघंटा

ललाटावर शोभे चंद्रछटा

करडा-भुरा रंग असे

मोहमायेतून निवृत्तीचा


४)

चौथे स्वरूप कुष्मांडा

माते निर्मिले तू ब्रम्हांडा

भगवा रंग शोभे शूरा जणू

भास्कराच्या उत्साही छटा


५)

पाचवे स्वरूप स्कंदमाता

कार्तिकेयचा गणेश भ्राता

रंग पांढरा पवित्र,शांततेचा

जणू प्रकाश चांगुलणाचा


६)

सहावे स्वरूप कात्यायनी घेवूनी जन्म 

महर्षी कात्यायनांच्या घरा

गौरवले त्यांच्या कुळा

रंग शोभे धैर्याचे प्रतीक निळा


७)

सातवे स्वरूप कालरात्रि

देई सदैव शुभ फल प्राप्ती

नाव शोभे त्रिनेत्री,शुभंकरी

प्रेम आपुलकीचा रंग गुलाबी


८)

आठवे स्वरूप महागौरी

कठोर तपस्या करुनी

जाहली महादेवाची अर्धांगीनी

जांभळा रंग करी आध्यामिक ज्ञानी


९)

नववे स्वरूप सिद्धीदात्री

करीसी सर्व सिद्धी प्रदान तू

उधळून नवरात्रीचे नवरंग तू

तारी भक्तगणास तू जय अंबे जगदंबे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational