Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

akshata alias shubhada Tirodkar

Inspirational

3  

akshata alias shubhada Tirodkar

Inspirational

नवरात्री

नवरात्री

1 min
324


नवरात्रीच्या नऊ रात्री 

भक्तगण देवीचा जागर करी 

नऊ रूपे नऊ दिवशी 

वेगवेगळ्या रंगाची महती 


पण खरंच आपण करतो का मनापासून भक्ती 

करत असतो तर दिसली असती का अशी परिस्थिती 

मुलगी जन्मास आली की नाक फिरवतात 

मात्र लक्ष्मीची पावले शुभ मानतात 


भिकारी मुलीला पाहिल्यावर हाकलून लावतात 

नवरात्रीत कन्यापूजनासाठी मात्र धडपडतात 

घरेलू हिंसेत जेव्हा उठतो हात 

तोच हात देवीची पूजा करण्यासाठी पुढे असतो 


आई डोळे भरून बसली आहे वृद्धाश्रमाच्या दारी 

आणि मुलगा देवीची आरती करतो अंबे कृपा करी 

अत्याचार करणारे असे कसे वागले 

स्त्रीच्या देवी रूपाला कसे नाही भ्याले 


नऊ दिवस असतो देवी आईचा जागर 

पण स्त्रियांना नाही आहे आदर 

देवी आईची भक्ती भावाने केली जाते पूजा 

पण तिच्याच स्त्री रूपाला मात्र नाही आहे सुरक्षा 


कित्येक येतील नवरात्र 

जागवतील भक्तीची रात्र 

स्त्रियांना जेव्हा वाटेल सुरक्षित आणि मिळेल आदर 

तो असेल खरा देवी आईचा जागर 


Rate this content
Log in