नवप्रेरणा
नवप्रेरणा
प्रेमळ जिव्हाळा वाढवून,
माणूसकीची तिजोरी भरू.
जनहितार्थ एकत्र लढून.
जीवन हे सार्थकी करू.
जातीवादाचा जाळून अहंकार,
देशभक्तीचे मळे फुलवू.
प्रत्येक पाऊल देशाच्या,
प्रगतीचा दिशेकडे वळवू.
क्रांतिकारांनी पाहिले जे स्वप्न,
सारे मिळून ते साकार करू.
नवप्रेरणा देशहिताची घेऊन,
थोडे सर्मपण आपण ही करू.
भ्रष्टाचाऱांचे, बलात्काराचे
राक्षस शोधून होळी पेटवू.
खारफुटीवरचे बांधकाम रोकून,
महापूरास आळा बसवू.
प्रत्येकाने झाडे लावत, जगवत.
भविष्य साऱ्यांचे सुंदर करू.
नवीनपिढीचे पाहून स्वैराचार,
अंजन डोळ्यात झणझणीत भरु.
सुसंस्कृत, संस्कार नागरिक घडवू.
डोळस होऊन सत्याचीच कास धरू.
परप्रांतीयांची घुसखोरी थांबवून.
नवप्रेरणेने देश सुफलाम् करू.
