STORYMIRROR

Vrushali Khadye

Inspirational

3  

Vrushali Khadye

Inspirational

नवं रूप!

नवं रूप!

1 min
644


(गीताची चाल- दिस जातील दिस येतील )


तुझ्या माझ्या वसुंधरेला सांग काय हवं

तुझ्या माझ्या संगतीनं देऊ रूप नवं

नव्या रूपामधी काय नवीन घडलं

वृक्षारोपणाने हिरवं सगळं होईल

नको तोडू तू, नको जाळू तू

वृक्ष जगवं,वर्षा येईल.........||धृ||


अवकळा अपुली जाईल संपूनी

सुखावेल धरा जीव शिवार फुलूनी

वाचवू या सारे, इंधन व पाणी

प्लॅस्टिक बंदी मंत्र हा,नेऊ कानोकानी

चूक अपुलीच परि

सुधारू सगळं

दुष्काळाशी झुंजायचं,जीवना देऊ बळ

नको तोडू तू,नको जाळू तू

वृक्ष जगवं,वर्षा येईल........||१||


अन्न पाणी वाया नको रे

घाण कचरा करू नको रे

तहानभूक मिटलं

स्वच्छताही दिसलं

आहेत निसर्गाचे ॠण

अपुल्यावरी रे

वसुधा ही कुणावाणी

कशी गं दिसलं

हिरवा शालू नेसलेली,नवरी भासलं

नको तोडू तू,नको जाळू तू

वृक्ष जगवं,वर्षा येईल......||२||


हरवले निवारे हे

पक्ष्यांची ना साथ

जंगल तोडीमुळेच

श्वापदे वस्तीत

तापमान वाढीमुळे

हाल तुझं माझं

धरणीचा पाण्याविन 

गेला बघं साज

काळजात माणुसकीचा

झरा पाझरत ठेव

पर्यावरणपूरक वापरून

वसवू नवा गाव

नको तोडू तू,नको जाळू तू

वृक्ष जगवं,वर्षा येईल.....||३||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational