नवीन आठवण असते..
नवीन आठवण असते..
ढगांनी भरून आलेलं आकाश,
रात्रीला ही नकोसं वाटतं.
चंद्राशिवाय रात्रीला ही,
कसं सुनं सुनं वाटतं.
अमावस्येचीचं ती रात्र,
कशीबशी जणू जाते.
आकाशाला ही रात्री,
एरवी भितीचं वाटते.
विजांच्या गडगडाटाने,
स्तब्ध आपण होतो.
हळू चं आई च्या,
कुशीतं आपण शिरतो.
आकाशाला तर तेवढे ही,
करणे अशक्य असते.
ढगांच्या कुशीतं शिरावे म्हटले,
तर तिथे पाणी चं असते.
पावसाची प्रत्येकाची,
कशी वेगळी गोष्ट असते.
दरवर्षी पावसाची काहीतरी,
नवीन आठवण असते
