नवे वर्ष नवा संकल्प
नवे वर्ष नवा संकल्प
नवे वर्ष नवा संकल्प
दवबिंदूची पहाट सोनेरी
नव वर्ष घेऊनी आलेत
सूर्य किरणे ही रूपेरी
भविष्याचा प्रकाश आपल्या
मुठीत लपला आहे आज
उघडूनी त्यास द्यावा
संकल्पनाचा नवा ताज
कर्तव्याचे पाठ घ्यावे
परक्याचे दु:ख जाणावे
स्मरणी असावा पश्चाताप
मत्सर भाव मनीचे जाळावे
शुद्ध आचरण निरामय जीवन
नव्या वर्षात सुख समाधान
मंगलमय सुविचार आचरणी
मिटवावे संसारातील व्यवधान
नव चैतन्याने ज्ञान घेवूनी
विश्वासाने सार्थ करणे
नव वर्षाचे नवे संकल्प
बंधूभावनेत भरूया मने
मानवतेचे पाईक आम्ही
विसरू नयेत कर्तव्याचे गान
माणसाला माणुसकीने जगण्या
नवे वर्ष हे लाभले छान
