STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Others

2  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Others

नवदुर्गा

नवदुर्गा

1 min
200

पहिली माळ,

शारद नवरात्री;

तू शैलपुत्री!


माळ दुसरी,

शारद नवरात्री;

ब्रह्मचारिणी!


तिसरी माळ,

मंदिरी वाजे घंटा;

तू चंद्रघंटा!


चौथी ती माळ,

वाजतो गं चौघडा;

देवी कुष्मांडा!


पाचवी माळ ,

स्तवन तुझे गाते ;

श्री स्क॔दमाते!

सहावी माळ,

तू जगाची जननी;

श्री कात्यायनी;


सातवी माळ,

शारद नवरात्री;

तू कालरात्री!


आठवी माळ,

भवानी, त्रिपुरारी;

श्री महागौरी!


नववी माळ,

शारद नवरात्री;

श्री सिद्धीदात्री!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract