STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational Others

3  

Jyoti gosavi

Inspirational Others

नवा उपक्रम

नवा उपक्रम

1 min
223

एक तर करोनाने 

बिघडवले सारे वातावरण

त्यातच तोंडावर 

आलाय दिवाळीचा सण

यंदा करू या आपण

 उपक्रम नवा 

गरिबांना वाटू या 

तूप साखर रवा

आनंदाला पण वाटून घेऊ 

त्यांच्याकडे पण बनू दे

दिवाळीचा गोड खाऊ 


कोरोनाच्या रुग्णांना होतो

श्वास घ्यायला त्रास 

या वर्षी करू या बंद फटाके

त्यांच्याकरता खास 

मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना

प्राणी पक्षी घाबरतात

उपाशीतापाशी बिचारे

कोठेतरी लपून बसतात

साऱ्या सृष्टीचा विचार करू

पशूपक्ष्यांना सुरक्षित राखू

त्यांचाही विचार करू थोडा

जीवाशी जीवाचे नाते

फक्त प्रेमाने जोडा

त्यांनाही आहे अधिकार

सुरक्षित जगण्याचा 

माणसा रे माणसा 

विचार कर स्वतःच्या

वागण्याचा 

तुझ्याच वागण्यामुळे 

आले संकट कोरोनाचे

आता तरी हो शहाणा

घे मंत्र जगण्याचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational