नूतन वर्षाभिनंदन
नूतन वर्षाभिनंदन
आजची सुप्रभात
उत्साह घेवून आली
नवे संकल्प, चैतन्य
सर्वांना देवून गेली !!
भुतकाळातील चांगले
स्मरण करूया
वर्तमान, भविष्य
सकारात्मकतेने जगूया !!
आशा आकांक्षांसोबत
उंच भरारी घेवूया
पंखांना बळ मिळू दे
देवाला प्रार्थना करूया !!
नातेवाईक मित्रांप्रती
भाव सलोख्याचा
नूतन वर्षाभिनंदन
वर्षाव शुभेच्छांचा !!
येणारे वर्ष जावो सर्वांना
आभाळभरुन आनंदाचे
निरामय आरोग्याचे
सुखाचे आणि प्रगतीचे !!
