STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Tragedy

4  

Prashant Tribhuwan

Tragedy

नशा

नशा

1 min
284


त्याने नशेला घेतले आहे सोबती

विसरण्यासाठी दुःख जीवनातले

पण कोण सांगेल त्या वेड्याला

हे जीवनच त्यामुळे आहे मिटले


पहिले प्यायचा दुःख विसरण्यासाठी

मग ती त्याची सवय गेली होत

दुःख मात्र वाढत गेले दिवसागणिक

आणि तो जगतोय तिला दोष देत


ती तिचे काम करतेय प्रामाणिकपणे

असली सोबत की तू विसरून जातो सारे

एकदा की चढली ती तुझ्या नसामध्ये

तू तोडून आणू शकतो आकाशातले तारे


तिच्या नादी लागून हे झाले बाहुले

ज्यात ना उरला काही भाव ना प्रेम

फक्त आठवता कवटाळतो तिला

हाच झालाय त्याचा रोजचा नियम


आयुष्याच साऱ्यात मोठे दुख 

तर क्षणभराची ती नशाच होती

आणि हे वेडे मात्र तिच्यासाठी

सारे आयुष्य लयाला लावती



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy