बंदिस्त..???
बंदिस्त..???
जीवनाच्या वाटेवर दुःखाची
लढाई लढत असताना
कंबर बांधून
मदतीसाठी
धावा मी केला
गणगोताला
सांगितली माझी कहाणी
कहाणी माझी ऐकताच
परक्यासारखे वागायला
लागले
चूक नसताना गुन्हेगार
मी झाले
उजेड म्हणता-म्हणता
अंधारात मी पढले
आपले आहेत
सोबतीला या विचारात
एकटीच मी राहिले
लाचार हे आयुष्य
मज वाटायला
लागलं
आयुष्याच्या युद्धात दमून
मी गेले
अचानक
मी बंदिस्त मी झाले
