हात त्याने हळूच सोडला
हात त्याने हळूच सोडला
हात हातात घेऊन बोलला होतास साथ देईन
रोज तुझ्या चेहऱ्यावर मी हसू आणूनच राहीन
भावना कधीही थांबवता येत नाही हे माहिती होतं मला
तू आलास आयुष्यात तेव्हा खऱ्या अर्थाने जाणवलं मला
वेळ मागितला होता मी थोडा आपल्या मैत्रीसाठी
विचार खूप करावा लागतो रे या समाजासाठी
दोनच दिवसात मांडलेला खेळ मोडला
वाटलं पकडलेला हात त्याने हळूच सोडला
