STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

पळता भुई थोडी होईल ..

पळता भुई थोडी होईल ..

1 min
204

असे कसे ढोंगी,पाखंडी सरकार 

रक्तपिपासू अन कार्पोरेटचे गुलाम 

महागाई, बेकारी जनता त्राहीमाम 

सरकार बेफिकीर ,तानाशाही तरीही 


शेतकरी,कामगार रस्त्यावर 

सरकार भलतेच अहंकारी राव 

थोडक्यात काय हंम दो हमारे दो 

वोट दो और बेशक भाडं मे जावो 


तुमचा विकास घावलाचं नाय 

चाय नंतर कशा -कशाचा भाव ?

केवढ्या वलग्ना ? येणार म्हणे 

अच्छे दिन ,कोणाचे आले ?


तुमचा विकास की विनाश ?

कळेचना ना गडे खरंच आम्हाला 

लोकशाहीचा राजा कफ्फलक अन 

लुटारूंचा केवढा हा बोलबाला 


पण एवढं लक्षात घ्या गड्यानो 

बाप तो बापच असतो ना 

रुम्हणं पडेल पेकाटात तेंव्हा 

पळता भुई थोडी होईल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy