STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy

3  

sarika k Aiwale

Tragedy

एकटा प्रवास ..

एकटा प्रवास ..

1 min
313

एकाकी वाटचाल माझी

एकाकी पायवाट ही

सुन्न शान्त रस्ता ही

सुरु माझ्या एकटिचा प्रवास

सोबतीला असे माझी सावली

रुसली आज तिही मजवरी

अंधारी कोठडी असे जीवनी

बोल अंतरीचे मी जपले मनी

त्यांच्या हसण्यात खुशी मानली

होऊन त्यांच्यासाठी च जगले

असुनही अस्तित्व मला ही

मी तुझीच चित्र रंगवली

आठवणीतही एकलीच दिसे मी

तूझ्या दारी वसे जरी तुळसी होऊनी

चालू असे प्रवास परतीचा हा

एकाकी शांत मंद शितल ही

असे माझी ओळख नाती ही

मी मी कोण पुसले तु जरी

असे श्वास तुझा तुज अमान्य मी

छाया असे मुलांना माया त्यांस न ऊमगली

अशीच एकटी जीवनी मी

असुनही अस्तित्व मला ही

नसे कोणास ही माहिती मी

शेवटचा प्रवास परतीचा

असे सुरू एकाकी एकटिचा प्रवास....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy