STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Tragedy Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Tragedy Inspirational

रोज रोज नि:शब्द होऊन

रोज रोज नि:शब्द होऊन

1 min
222

रोज रोज नि:शब्द होऊन

शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना ती बघायची

आपल्याही पाठीवर दप्तर असावं असं ती म्हणायची


त्यांच्या अंगातला गणवेश पाहून

ती तिचा फाटका फ्रॉक झाकून घ्यायची

त्यांच्यासारखं टापटीप दिसावं म्हणून

ती थोडं नटून यायची


मधल्या सुटीत मुलामुलींना

खाऊ खाताना लांबूनच बघायची

त्यांचा लडीवाळा गंमतीजमती

ती डोळ्यात भरून घ्यायची


शाळेच्या आवारात

मुलामुलींचा खेळ पाहून

तिला हसु यायचे

त्यांच्या सोबत आपणही असावे असं तिला वाटायचं


शाळा सुटल्यावर

आईबाबाचा बोट धरून

जाणाऱ्या मुलामुलींना

ती कुतूहलाने बघायची

कितीतरी अपेक्षित स्वप्न

घेऊन ती शाळेच्या बाहेर

उभी राहायची


परस्थितीअभावी तिला शाळेत जाता येत नव्हते

म्हणून ती बाहेर उभी राहून

शाळेत आल्याचा आनंद घ्यायची

अभिमानाने आभाळाला कवेत घेणाऱ्या तिरंग्याला

स्वाभिमानाने वंदन करायची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy