Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Kadam

Abstract Tragedy

4  

Prashant Kadam

Abstract Tragedy

नोकरी

नोकरी

1 min
240


शोधतो काम मी दिवसा रात्रो ही

मागतो काम मी पाठवूनी मेल ही


पदव्या जड माझ्या फिरतो घेवूनी 

झिजवतो जोडे रोज रोज चालूनी


मुलाखती देवूनी थकलो किती तरी

दूर तरी कर्मभूमी दूर ती नोकरी


बेकारीचे दुःख हे फिरतो घेवूनी 

कंठ असा दाटतो आसवे गाळूनी


ओठ शुष्क झाले विनवूनी बोलूनी

उरले आता मुखी परी नाम ते ईश्वरी 


भेटेल का नोकरी पुजुनी अर्चूनी ?

की करू खुशामती पुढारी गाठूनी ?


गुणवत्ता असूनही यश नसे जीवनी

नकाराचा खेळ हा दावशी कुठवरी ?


Rate this content
Log in