नमन त्या समर्पित वातीला!
नमन त्या समर्पित वातीला!
अखंड ज्योती प्रज्वलीत.
जिद्द ती माझी एकटीची.
सोनेरी किरणात तेजस्वी.
माझ्या संसाराची हर रात.
तेलासारख्या संसारात.
काय निसटावे माहीत नाही.
कांचनरंगी तैल पसरले.
काचेतूनी दिसती ते अंतस्थात.
सूक्ष्माकडूनी ब्रम्हांडात.
संसार गुंफिला संसारात.
हर समईत बघा तिचे स्मित.
डुंबलेले आणिक समईत स्थित.
वातीचे उद्यम ते अदृश्य.
झोकूनिया दिले संसारात.
कुशीत तिच्या तेल पहूडले .
मऊशार अशा कापसी अंगात.
संसारा संसारा का आहेस गर्वात?
प्रभात तुझी मूढ अंधारात.
नमन कर वातीस सुरवातीस.
तिच्या शिवाय का येईल प्रकाश पदरात?
एक प्रेक्षक म्हणुनीया बघ हा ब्रह्मांड.
काचेतुनी दिसती तैलासम सुवर्णं संसार.
संसारात उर्जीत तिमिरासंग प्रदीप्त मैत्री.
वातीसारखी स्थापिते, फक्त आणि फक्त, स्त्री.
