STORYMIRROR

Satish Wadekar

Tragedy

2  

Satish Wadekar

Tragedy

नको आईपण

नको आईपण

1 min
14.4K


सुरकुत्या

मुखावर

बहुत जर्जर ।

कंप भरे

अंगभर

सदा थरथर ।।1।।


हसू दिसे

काहीसे

तेही वरवर ।

परि आत

हृदयात

तिची मरमर ।।2।।


लेक तिचा,

नवसाचा,

झाला लक्षाधीश ।

मातेपाशी,

नसे राशी,

घेण्यासाठी विष ।।3।।


काट्याकुट्या

वेचताना

दिसे राबताना ।

दुःख तिचे

पाहताना

खाली जाती माना ।।4।।


जन्मभर

जपलेला

जिवापाड ज्याला ।

वृद्ध माय

तिची सय

न येई लेकाला ।।5।।


जरी थोर

घर त्याचे

चार इमल्याचे ।

दहा वीत

त्या आईचे

हो अडचणीचे ।।6।।


लेकासाठी

वणवण

जरी झुरे मन ।

गर्भी मार

असे पोर

नको आईपण ।।7।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy