नकळत ती भेटली
नकळत ती भेटली
नकळत एकदा ती मला भेटली
भेटता क्षणी मनात माझ्या भरली..
अनोळखी ती होती माझ्या साठी
अन् मी तिच्या साठी...
पण तिला बघून असे वाटत होते
ती तर माझीच होती आणि आहे..
हळूहळू हिम्मत करून मी तिच्या पुढे
जाऊन उभा राहिलो तिने बघताच
पळून माघारी आलो...
ती पण काही न बोलता परत निघून गेली
हळूहळू तिची साऊली ही नष्ट झाली...
आता तर माझ्या मना बरोबर
डोळ्यांना ही तिला बघण्याची ओढ लागली..
तिला भेटण्याच्या इच्छा मनात बाळगत
एके दिवशी पुन्हा मी तिच्या शोधात
त्याच ठिकाणी गेलो
ती न दिसताच मला मी निराश होवून
तसाच माघारी घरी परत आलो...
शेवटी नकळत ती भेटली ....आणि
नकळतच दुरावली गेली...

