नका गर्भात मला मारू
नका गर्भात मला मारू
नका गर्भात मला मारू
डॉक्टरहो बाजार नका हो मांडू !
हा गर्भ परीक्षणेचा स्त्री भ्रूण हत्येचा !!
जगवा मला हो ह्या जगात येण्यासाठी !
जगण्यासाठी द्या मजला हो शक्ती !
बनेल हो मी पण उद्याची आदिशक्ती !!
आई, बिंदू असेल गं मी आज तूझ्या गर्भात !
बाबा, रेषा बनेल हो मी उद्या तुमचा हात हातात घेऊन !
आजी-आजोबा , बघता बघता बनेल मी पण एक कलिका, तुमच्याच छाये छत्रात !!
समस्त भारतवासी हो , कलिका असताना !
मी मिळवेल कि हो तुमच्याच आधारे मंत्र !
नवं जीवनाचा ! जगण्याचा !!
आई-बाबा, आजी-आजोबा, डॉक्टर हो !
नका हो गर्भात मला मारू !
नका हो स्त्रीभ्रुण हत्या करू !!
द्या मलापण हो ह्या जगात येण्याचा मान !
मानानेच घेऊन येईल मी दैवी शक्ति ह्या जगात !
बनेल हो मीपण उद्याची आदिशक्ति !!
आदिशक्ति !आदिशक्ति !आदिशक्ति !!!