नजरेस पडल्यापासून तू
नजरेस पडल्यापासून तू
नजरेस पडल्यापासून तू माझ्या
घडलिय कशी जादू
जिकडे पाहतो तिकडे तू
प्रतिमेत प्रतिबिंबात तू
मनात तू, ध्यानात तू
अन अंतरलेल्या क्षणात तू
पानात तू फुलात तू
दरवळलेल्या सुगंधात तू
नवल म्हणू की किमया
मनमोहक झाली दुनिया
नवीनवीशी हवीहवीशी
चांदण शीतल छाया

