तू नसते तेथे
तू नसते तेथे
तू नसते तिथे मी असाच फिरून येतो
आठवणीत तुझ्या असाच झुरून येतो
तू असायची जिथे,वाट पाहत बसलेली
उशीर झाला मला म्हणून थोडीशी रागावलेली
त्या जागेवर एकदा नजर फिरवून येतो
आठवणीत तुझ्या असाच झुरून येतो
चांदणे टपोर पडलेले,लक्ष त्याकडे नसते
माझे आभाळ तुझ्याविना रिते मला भासते
तुझ्या स्पर्शाचा वारा अंगी झेलून घेतो
आठवणीत तुझ्या झुरून येतो...

