आठवण येत राहील
आठवण येत राहील
तू जाशील अशी दूर निघून
मी एकटाच राहील तुझ्यावाचून
येणार नाहीस तू जरी ठाऊक असेल
तरी डोळे वाट तुझी बघत असेल
माहिती कोणाचीच कोणाला नसते
दुनियेची हीच रीत असते
नशीबाने लाभते प्रेम आयुष्यात
नाहीतर हे आयुष्य एक तडजोडच ठरते
मला नाही मिळाली तुझी साथ जरी
सावरेल मी स्वतःला दुःख ठेवून अंतरी
तू जाण्याचे दुःख मलाही होईन
कितीही सावरले तरी मन अश्रुतुन वाहीन....

