शाळेत असताना
शाळेत असताना
शाळेत असताना पावसात भिजायला मजा यायची
जिन्यातून माझी ओलिचिंब एन्ट्री व्हायची
पाहून मला समोर, हलकेच ती लाजयची
मला पाहून तीही थोडं पावसात भिजयची
जेव्हा रुसायची नाक मुरडून
तेव्हा "का नाही विचारलेस तू मला?"
असं म्हणून अजून रुसायची
पाऊस तर फक्त बहाणा असायचा
तिला माझ्या प्रितीत भिजवण्याचा इशारा असायचा

