खरेच माझ्यावर प्रेम करतेस
खरेच माझ्यावर प्रेम करतेस
मनातले अबोल भाव
नयनातून उघडतेस
मी टिपायला जाताच
नयन मिटून घेतेस
कळत नाही अदा तुझी
अशी का वागतेस
कधी दूर जाऊनही
जवळी तू भासतेस
कधी वाट बघतेस
कधी वाट चुकतेस
कधी खूप आठवतेस
कधी विसरून जातेस
खरच कळत नाही
अस का करतेस
मला जाणून बुजून चाळवतेस
की खरच माझ्यावर प्रेम करतेस

