मनी दडलेला प्रश्न
मनी दडलेला प्रश्न
मनी दडलेल्या प्रश्नाचे
उत्तर काही मिळेना
का जगतोय मी
माझेच मला कळेना
जीवनाला माझ्या या
अर्थ काही मिळेना
अर्थ हीन जगणे हे
सावरता येईना
नागमोडया वळणाची
वाट काही मिळेना
दिशा जीवनाची दाखवायला
वाटाड्या कोणी मिळेना
