Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Karishma Dongare

Tragedy Others

4  

Karishma Dongare

Tragedy Others

नजर लागली पंढरीच्या वारीला

नजर लागली पंढरीच्या वारीला

1 min
258


नजर लागली पंढरीच्या वारीला

कुठे हरवली भक्ती पांडुरंगाची

कोणी नसे आज या पंढरीत

वारीला सर नव्हती कशाची.||१||


नजर लागली पंढरीच्या वारीला

सुखे वाटे भीमा नदीचे वाळवंट

दुर जाई नजर सारे मोकळेच

सुखा पडलाय प्रत्येकाचा कंठ.||२||


नजर लागली पंढरीच्या वारीला

तार्यांसारखी चमकणारी पंढरी

कुठे भक्तीत बुडालेला वारकरी

कुठे पायवाट ती गजबजनारी.||३||


नजर लागली पंढरीच्या वारीला

ना कधी मोगल अडवू शकले

ना कधी आडवे आले इंग्रज

कोरोनाणे धुमाकूळ किती घातले.||४||


नजर लागली पंढरीच्या वारीला

नाही आवाज येत आता भजनाचा

टाळही वाट बघून थकलेत रे

आवाज नाही ऐकला चीपळ्यांचा.||५||


नजर लागली पंढरीच्या वारीला

आठवे सारे ते सोहळे पहिले

डोळ्यांच्या कडा येतात भरुन

पांडुरंगा ये धावून खूप सोशीले.||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy