नियतीचा डाव
नियतीचा डाव
जगायचं होतं
श्वास घेऊनच
मरायचं मुळी
आस ठेऊनच | |१| |
कशासाठी आलो
मना प्रश्न पडे
मरणार कधी
श्वास उरी दडे | | २| |
हवा खेळायला
नियतीचा डाव |
वेळ काढायला
नका खाऊ भाव | |३| |
नका करू खेद
नाही वेळ गेला |
करा काही नेम
कशापायी मेला? | |४| |
वारे सुगंधित
लागलेत वाहू |
नका आतातरी
घाणीतच राहू | |५| |
