निवृत्ती
निवृत्ती
होत आहात निवृत्त फक्त ह्या ऑफिसमधून
नाही ती निवृत्ती तुम्हाला आमच्या प्रेमामधून
आत्ता असं डोळ्यातून पाणी नाही आणायचं
जीवनाच्या पीचवर खेळायला जोमाने उतरायचं
सेकंड इनिंग खेळायचा मिळाला आहे मौका
आनंदाच्या ग्राऊंडवर आनंदाने मारा चौका
सोमवार, मंथ एण्ड, ऑडिट सगळंच विसरा
कॅलेंडरवर सगळेच दिवस रविवार लिहून काढा
आत्ता ह्यापुढे मस्त टेंशन फ्री होऊन जगायचं
आपल्या आवडत्या छंदात खूप खूप रमायचं
जुन्या यार दोस्तांचा रोज भरू दे आता मेळा
दुनियादारीच्या कट्ट्यावर दुसरी इनिंग खेळा
पण... पण...
म्हणून आमच्या तावडी मधून सुटका मिळणार नाही..
आम्ही तुम्हाला कधीच कधीच निवृत्त करणार नाही...
निवृत्त करणार नाही...
