मोहात तुझ्या पडते
मोहात तुझ्या पडते
1 min
194
पाहते रोजच तू दिलेल्या लाल गुलाबाकडे
तुझ्या सोबतीने जगलेल्या प्रत्येक क्षणाकडे
स्मरते दोघांनी व्यक्त केलेली रात्र कवितेची
आजही मोहात तुझ्या मी पुन्हा पुन्हा पडते.....
तुलाही वाटते का ते आपले क्षण पुन्हा जगावे
पुन्हा त्या कविता, गझलेच्या मैफिलीत भेटावे
मंतरलेली रात्र आणि तुझी माझी साथ असावी
मग ये ना मिटव हे अंतर तुझ्या एका ओळीने...
तूझ्या येण्याची अन् बोलावण्याची वाट मी बघते
तुझ्या कवितेच्या प्रत्येक ओळीत मी मला शोधते
मला, माझ्या शब्दांना आस ही आहे फक्त तुझीच
कारण...
आजही मोहात तुझ्या मी पुन्हा पुन्हा पडते...