तुझ्यातला कोपरा
तुझ्यातला कोपरा
तू जवळ नसून ही कधीही दूर नाही
विरह हा येणारच तरीही दुरावा नाही
तुझ्यातल्या माझा कोपरा मी सोडणार नाही...
आपल्यातले अंतर कधीही वाढणार नाही
असला अबोला तरीही बोलणे थांबणार नाही
तुझ्यातल्या माझा कोपरा मी सोडणार नाही...
तू जा पुढे तुला कधीही अडवणार नाही
मी ह्या जागेवरूनी तरीही हलणार नाही
तुझ्यातल्या माझा कोपरा मी सोडणार नाही...
माझ्यातल्या तुला माझ्या आनंदाला कधीच सोडणार नाही....