दोष कुणाचा
दोष कुणाचा
दोष नक्की कुणाला हा द्यावा
मला कि तुला एकदा सांग ना...
तुझ्याकडे धाव घेणाऱ्या या मनाला
कि लांब जाणाऱ्या तुला सांग ना...
तुलाच सगळीकडे शोधणाऱ्या नजरेला
कि बघून सुद्धा टाळणार्या तुला सांग ना...
तुझ्या अवतीभवती फिरणाऱ्या मनाला माझ्या
कि सहवासही नको असलेल्या तुला सांग ना...
दोष ना हा कुणाचा ना तुझा ना माझा
खेळ आहे सगळा ह्या मनाचा हो ना...हेच ना...
सांग ना रे फक्त एकदाच....

