पहिली भेट
पहिली भेट
सरता किती दिवस,भेट ही आहे खास
डोळ्यांना आहे तुला बघण्याचीच आस
घाबरलं हे मन तरी आतुर तुज भेटाया
कारण आहे आपली पहिली भेट आज
काय बोलायचं नी कधी कसं बोलायचं
तूला पाहताच डोळ्यांनी हळूच लाजायचं
मनाला लागला आहे ह्या भेटीचा खूप ध्यास
कारण आहे आपली पहिली भेट आज
किती वेळ अशीच उभी मी आरश्यासमोर
दिसतेयं का बरी करते सारखा हा विचार
येतो प्रश्न मनात आवडेन ना रे मी तुला
कारण आहे आपली पहिली भेट आज
भेटीची आपल्या वेळ आली आता समीप
चुकला हा ठोका आणि सुटला तो धीर
धडधड किती ती वाढू लागली मनाची ह्या
कारण आहे आपली पहिली भेट आज

